आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स करणार; पद्माकर शिवलकर, पांडुरंग साळगावकर यांचा सन्मान

426

माजी ‘फिरकीवीर’ पद्माकर शिवलकर आणि वेगवान गोलंदाज पांडुरंग साळगावकर या नामवंतांच्या  गेल्या अनेक दशकांतील क्रिकेटमधील योगदानाची सन्मानपूर्वक नोंद घेत हिंदुस्थानची  आघाडीची खासगी आयुर्विमा कंपनी आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स मंगळवार, 3 डिसेंबर रोजी नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे सायंकाळी 7 वाजता  एका विशेष समारंभात या महान गोलंदाजांचा  सन्मान करणार आहे.

 माजी धडाकेबाज फलंदाज आणि कसोटीपटू विनोद कांबळी यांच्या उपस्थितीत, आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विघ्नेश शहाणे यांच्या हस्ते हा सन्मान  केला जाणार आहे. या कृतज्ञता सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रख्यात अँकर, पत्रकार आणि क्रिकेट समीक्षक  द्वारकानाथ संझगिरी करणार आहेत. या सोहळ्याला संजय बांगर, राजू कुलकर्णी, प्रवीण आमरे, सुधीर नाईक, सुलक्षण कुलकर्णी, मिलिंद रेगे, विजय लोकापल्ली आदी नामवंत  क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आयडीबीआय फेडरलने साठच्या दशकातील माजी रणजीपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील नामांकित प्रशिक्षक  वासू परांजपे यांचा अशाच एका समारंभात बहुमान  केला होता. महान क्रिकेटपटू ‘भारतरत्न’  सचिन तेंडुलकर 2016 सालापासून आयडीबीआय फेडरलच्या मॅरेथॉनचा चेहरा होता आणि आता 2018 सालापासून तो  कंपनीचा  ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ आहे.

मी, पद्माकर शिवलकर आणि पांडुरंग साळगावकर या दोन्ही नामवंत क्रिकेटपटूंनी या खेळासाठी दिलेल्या अपार योगदानाचे कौतुक आदर करतो. त्यांचे कौशल्य, ज्ञान आणि खेळाबद्दलची वचनबद्धता अपवादात्मक होती आणि ते खरोखरच पुढच्या पिढीच्या क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेरणास्थानी आहेत.’

-विघ्नेश शहाणे, एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स 

आपली प्रतिक्रिया द्या