‘पद्मावती’वरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरुन भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या टिप्पणीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. थरूर यांच्या टिप्पणीवर ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह आणि अमरिंदर सिंह यांचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला आहे. थेट राजपूत राजांच्या घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची नावे घेऊन त्यांनी इराणी यांनी थरुर यांना लक्ष्य केले आहे.

सन्मानाला धक्का बसत असल्याचा दावा करत काही कथित शूर राजेमहाराजे एका चित्रपट निर्मात्याच्या मागे लागले आहेत. पण त्याच महाराजांनी ब्रिटीशांनी आदर-सन्मान पायदळी तुडवल्यानंतर तेथून पळ काढला होता, असे शशी थरुर म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या