पेड सोशल मीडिया, बल्क एसएमएस म्हणजे जाहीर प्रचारच

38

मुंबई/नागपूर – मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपल्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा आणि बल्क एसएमएसचा वापर करण्यात येतो, मात्र सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना सावधगिरी बाळगावी लागणार असून पेड सोशल मीडिया आणि बल्क एसएमएस हा जाहीर प्रचार समजला जाणार आहे. निवडणूक प्रचारासाठी पेड सोशल मीडियाचा वापर करणाऱया उमेदवारांविरोधात कारवाई करण्यात येईल अशी माहिती नागपूरचे पालिका आयुक्त श्रवण हार्डिकर यांनी दिली. नागपूर पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱयांच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या