बाळू धानोरकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रकाराने स्वतःच्या रक्तानेच काढले चित्र

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील चित्रकाराने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे रक्ताने चित्र काढले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातले चित्रकार प्रल्हाद ठक यांनी हे चित्र काढून धानोरकरांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रल्हाद ठक यांनी आतापर्यंत स्वातंत्र्यसंग्रामातील देशभक्तांचे विविध पोर्ट्रेट्स स्वतःच्या रक्ताने काढले आहेत. वरोरा शहरात या रक्ताने काढलेल्या देशभक्तांच्या चित्रांच्या गॅलरीचे लोकार्पण खासदार बाळू धानोरकर यांनीच केले होते. तेव्हा या उपक्रमाचा खासदार बाळू धानोरकर यांनी गौरव केला होता. आज प्रल्हाद ठक यांनी लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी  स्वतःच्या रक्तानेच त्यांचे चित्र काढले व त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.