मनोवेधक ‘खयाल’

चित्रकार वैभव नाईक यांनी विविध माध्यमांत साकारलेल्या मनोवेधक चित्रांचे ‘खयाल’ हे सोलो प्रदर्शन 20 मार्चपासून नरिमन पॉइंट येथील कमलनयन बजाज कलादालनात सुरू आहे. नाईक यांनी साकारलेली चित्रे प्रामुख्याने भावनात्मक व मनोविश्लेषणात्मक अशी आहेत. अनेक भावनांचे यथार्थ दर्शन त्यांनी आपल्या चित्रशैलीतून घडवले आहे.  प्रदर्शन  26 मार्चपर्यंत  सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत विनामूल्य पाहता येईल.