चित्रांनी दिला आत्मसन्मान

18

>> विघ्नेश जांगळे, ठाणे

आजच्या काळात महागाई खूप वाढली आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच माझ्या छंदातूनच काही कमाई होईल का याचा विचार मी केला. मला चित्रं काढायला खूप आवडतं. चौथीत होतो तेव्हापासून मी छान चित्रं काढायचो. त्यावेळी सगळे माझ्या चित्रांची तारीफ करायचे… चित्रं काढताना मी त्यात हरवून जातो. माझ्या चित्रांच्या विक्रीमधून जे किडूकमिडूक पैसे मिळतात त्यातून मी माझा खर्च भागवतो. आईवडिलांवर माझा भार जितका पडणार नाही या विचारात मी असतो.

मी दिवाळीच्या दिवसांत कंदिल बनवतो. त्यातून मला बऱयापैकी पैसे मिळतात. माझी चित्रकारीची हौस मी कंदिलांवर चित्रे रंगवून पुरी करून घेत असतो. त्यातच गणेशोत्सवात मी मखरही बनवतो. माझ्यामध्ये ही कला ठासून भरली आहे असंच मला वाटतं. कंदिल असो की मखर… मी फक्त इकोफ्रेंडली काम करतो. माझ्या कामामुळे, माझ्या छंदामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही हे मी बघतो. टीशर्टवर पेंटींग, वॉल पेंटींग आणि शूज पेंटींगही मी छान करतो. त्याचेही मला पैसे मिळतात.

दहावीपर्यंत मी शाळेत किंवा बाहेरचे चित्रकलेचे क्लास लावून या कलेचं प्रशिक्षण घेतलं. अकरावी आणि बारावी आर्ट्समध्ये पूर्ण केल्यावर मी जे.जे.साठी प्रयत्न सुरू केले. दुसऱ्या वर्षी मला तेथे प्रवेश मिळाला. या क्षेत्रात मला मोठे नाव कमवायचे आहे.

वेगळ्या वाटेवरचे छंद
तरुणाईला नेहमीच खुणावतात.
आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट
आम्हालाही सांगा… छायाचित्रासहित.
आमचा पत्ता- Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-२५ [email protected] वरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या