पैशांचा पाऊस भाग १३ -बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय?

124

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

शेअर बाजारामध्ये एक एक पाऊल सावधगतीने टाकत आपला प्रवास आज ‘बाय बॅक ऑफ शेअर्स’पर्यंत पोहचला आहे. पोस्ट होणारे हे लेख आज खूप नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहचत आहेत. लेख वाचून खूप जणांनी गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्याची इच्छा असल्याचे कॉल आणि मेसेज फेसबुक, व्हॉट्सअॅपवर येत आहेत या सर्वाना एकच सांगणे आहे, आता कुठे आपण शेअर बाजारातील एक एक पायरी चढत आहोत त्यामुळे अधीर ना होता शेअर बाजाराचा कळस गाठूया. कोणत्याही खेळाचे पूर्ण नियम माहिती असल्याशिवाय त्या खेळात उतरणे म्हणजे अपयशायची तयारी करणे. त्यामुळे घाई-घाईत काही निर्णय घेऊ नका. शेअर बाजार आयुष्यभर चालूच राहणार आहे त्यामुळे संयम ठेवा आणि स्वतःचा अभ्यास वाढवा. जेव्हा तुमचा अभ्यास परिपूर्ण असेल तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल. आज आपण “बाय बॅक ऑफ शेअर्स” म्हणजे नक्की काय ? हे पाहणार आहोत.

>> बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे काय ?
सहज सोप्या भाषेत बाय बॅक ऑफ शेअर्स म्हणजे सध्याच्या शेअरहोल्डरकडे असलेल्या शेअर्सची पुनःखरेदी. जेव्हा एखाद्या कंपनीला भविष्यातील तिच्या कामगिरी बद्दल आत्मविश्वास असतो तेव्हा मार्केट मधील शेअर्स होल्डर कडे असलेले शेअर्स बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून खरेदी केले जातात. बाय बॅक ऑफ शेअर्स हे एक सकारत्मक पाऊल आहे.

>> शेअर्स होल्डरसाठी सकारत्मक की नकारात्मक ?
बाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर बाजारात सकारात्मक समजले जाते कारण जेव्हा कंपनीचे प्रमोटर्स स्वतःचे शेअर्स मार्केटमधून खरेदी करायला तयार असतात तेव्हा शेअर्स होल्डर्सचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे बाय बॅक ऑफ शेअर्स हे शेअर होल्डर्स बरोबर सर्वांसाठी सकारात्मक असते

>> बाय बॅक ऑफ शेअर्सचे प्रकार

बाय बॅक ऑफ शेअर्सचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे
१. टेंडर पद्धत
२. ओपन मार्केट पद्धत

१. टेंडर पद्धत :- ही सर्वात सोपी पद्धत आणि जास्त वापरात येणारी पद्धत आहे. टेंडर पद्धत आपण उदाहरण पाहून समजून घेऊया. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट मधील किंमत ५०० रुपये असेल तर टेंडर पद्धतीनुसार ती कंपनी बाय बॅक ऑफ शेअर्सच्या माध्यमातून एका ठराविक किंमतीला ती समजा ५५० रुपयांना सध्याच्या शेअर्स होल्डर्सना ठराविक काळात (काही दिवस) प्रस्ताव ठेवतात. टेंडर पद्धतीमध्ये बाय बॅक ची किंमत ठरवलेली असते.

२. ओपन मार्केट पद्धत :- ओपन मार्केट पद्धतीमध्ये शेअर्सची जास्तीत जास्त किती किंमत कंपनी देऊ शकते ती किंमत ठरवली जाते आणि मग सर्वाकडून बाय बॅक ऑफ शेअर्सची ओपन ऑफर ठेवली जाते. समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केटमधील किंमत ५०० रुपये असेल आणि कंपनी ने ऑफर पद्धतीने बाय बॅक ऑफ शेअर्स नुसार १००० ही जास्तीत जास्त किंमत ठरवली. म्हणजे ज्या कुणाला या बाय बॅक ऑफ शेअर्सला अर्ज करायचा आहे ते त्यानुसार किंमत ठरवून बाय बॅकचा लाभ घेऊ शकतात. १००० च्या वरील किंमतीचा ते विचार करणार नाहीत कारण ती त्यांची जास्तीत जास्त बोली असते.

काही दिवसांपूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या हिंदुस्थानातील अग्रगण्य कंपनी ने टेंडर ऑफर द्वारे बाय बॅक ऑफ शेअर्सचा प्रस्ताव त्यांच्या शेअर्स होल्डर साठी ठेवला आहे. बाय बॅक ऑफ शेअर्स मध्ये भाग घेणे किंवा न घेणे हे पूर्णपणे शेअर्स होल्डरच्या मर्जीचा विषय आहे. त्यामुळे पूर्णपणे विचार करून निर्णय घ्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या