पैशांचा पाऊस भाग १४ – राईट इश्यू शेअर्स म्हणजे काय?

75

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

बोनस शेअर्स आणि स्प्लिट शेअर्सनंतर आज आपण राईट इश्यू म्हणजे काय ते बघणार आहोत. राईट इश्यू म्हणजे अशी ऑफर जी सध्याच्या शेअर्स होल्डर्सना दिली जाते. राईट या शब्दाच्या अर्थानुसार राईट म्हणजे अधिकार आणि या अधिकाराप्रमाणे सध्याच्या शेअर्स होल्डरना नवीन शेअर्स देण्याची प्रक्रिया म्हणजे राईट इश्यू.

• राईट इश्यू म्हणजे नक्की काय ?
जेव्हा एखाद्या कंपनीला व्यवसायासाठी छोट्या रक्कमेची भांडवलाची गरज असते तेव्हा आपल्या सध्याच्या शेअर्स होल्डरकडून भांडवल उभारणीचा विचार करतात आणि त्यांना राईट इश्यू ची ऑफर देतात. या ऑफरचे वैशिष्ट्य म्हणजे ही ऑफर शेअर्सच्या मूळ किमतीपेक्षा कमी भावात दिली जाते. म्हणजे जर समजा XYZ कंपनीचा मार्केट मधील शेअरचा भाव १०० रुपये असेल तर त्याची राईट इश्यू ८५ रुपये म्हणजे १५% सवलतीत शेअर्स होल्डरला मिळते.

• राईट इश्यूमध्ये शेअर्स होल्डरना किती शेअर्स दिले जाणार कसे ठरवतात ?
शेअर्स होल्डरकडे उपलब्ध असलेल्या शेअर्स आणि कंपनीने ठरवलेला प्रमाणानुसार शेअर्स होल्डर मागणी करू शकतात. जसे ३:१ प्रमाण असेल आणि एखाद्या शेअर्स होल्डरकडे ३०० शेअर्स असतील तर तो १०० शेअर्सची मागणी करू शकतो. राईट इश्यूमध्ये शेअर्स होल्डर जास्त शेअर्सची मागणी करू शकतात कारण बहुतेक शेअर होल्डर्स राईट इश्यूमध्ये रस दाखवत नाहीत. अशा वेळेस राहिलेले शेअर्स मागणी करणाऱ्या शेअर्स होल्डर ला मिळू शकतात.

• शेअर्स होल्डरचा डायरेक्ट फायदा काय ?
मार्केट भावापेक्षा कमी भावात मिळणारे शेअर्स हाच शेअर होल्डरचा फायदा राईट इश्यूमुळे होतो. शेअर बाजारातील या छोट्या छोट्या गोष्टी शेअर बाजाराला इतर गुंतवणुकीपेक्षा वेगळ्या करतात. लक्षात ठेवा शेअर बाजार म्हणजे गुंतवणूक किंवा ट्रेडिंग म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे तुम्ही गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या प्रमाणात तुम्ही मालक असता. बोनस शेअर्स, स्प्लिट शेअर्स किंवा राईट इश्यू हे शेअर बाजारात उतरणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती असणे गरजेचेचं आहे आणि हीच माहिती पुढे गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेताना उपयोगी पडते.

आपली प्रतिक्रिया द्या