पैशांचा पाऊस भाग २० – शेअर बाजार गुंतवणूक, ट्रेडिंग आणि त्यावरील कर

171

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

आपण शेअर बाजारातील नफ्यावर लागणारे शॉर्ट टर्म गेन आणि लॉंग टर्म गेन टॅक्स पाहिले. आता आपण शेअर बाजारात नुकसान झाल्यास हे नुकसान आपण टॅक्स प्लानिंग करताना कशा पद्धतीने दाखवू शकतो ते पाहूया.

शेअर बाजार हा देशाच्या आर्थिक विकासाचे स्वरूपावर अवलंबून असतो आणि तसेच जागतिक घडामोडीचा यावर परिणाम होत असल्यामुळे कधी तेजी कधी मंदी या फेऱ्यातून तो जात असतो. शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणाऱ्यालाही कधी नफा कधी तोटा या तत्वावर प्रवास करत आपल्या गुंतवणुकीला योग्य दिशा द्यायची असते. या चढ -उतारामुळे एखाद्या वर्षी नफा एखाद्या वर्षी तोटा आणि याचे कर नियोजन कसे करायचे हेही माहित असणे गरजेचेचं आहे. जसे नफा झाल्यास आपण शॉर्ट टर्म गेन टॅक्स भरतो, तर तोटा झाल्यास तो तोटा कुठे तरी ऍडजस्ट व्हायला हवा हो ना? चिंता करू नका हा ऍडजस्ट होतो कसा ते बघू

१. शॉर्ट टर्म लॉस हा शॉर्ट टर्म गेन किंवा लॉंग टर्म गेन समोर सेट ऑफ करू शकतो. समजा एखाद्या गुंतवणूकदाराला गेल्या वर्षी शॉर्ट टर्ममध्ये ४०,००० चे नुकसान झाले आणि या वर्षी त्याला शॉर्ट टर्ममध्ये किंवा लॉंग टर्ममध्ये ४०,००० चा फायदा झाला असेल तर त्याला त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावं लागणार नाही आणि लॉंग तेर गेन हा करमुक्तचं असतो.

२. लॉंग टर्म लॉस हा लॉंग टर्म गेन च्याच समोर सेट ऑफ होतो. समजा एखाद्या गुंतवणुकदाराने २०१० साली A कंपनीमध्ये ५०००० आणि B कंपनी मध्ये ५०,००० गुंतवणूक केली असेल आणि आज A कंपनी ची गुंतवणूक १,००,००० झाली असेल आणि B कंपनी ची गुंतवणूक २५००० म्हणजेच लॉसमध्ये गेली असेल तर कॅपिटल गेन (कंपनी A नफा – कंपनी B तोटा ) असे पाहता ७५,००० होईल.

३. शॉर्ट टर्म लॉस हा पुढील ८ वर्ष सेट ऑफ करता येतो म्हणजे समाज एखाद्या ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीला २०११ मध्ये २,००,००० रुपयाचे नुकसान झाले तर तो तिथून पुढे २०१९ पर्यंत त्याला होणाऱ्या नफ्यासमोर सेट ऑफ करू शकतो. म्हणजेच काय तर भूतकाळातील झालेलं नुकसानचे तुम्ही भविष्यात टॅक्स वाचवण्यासाठी करू शकता.

अशा पद्धतीने शेअर बाजारातील व्यवहारावर टॅक्स आकाराला जातो. ही फक्त दर्शनी स्वरूपाची माहिती आहे. अधिक माहितीसाठी चार्टर्ड अकाउंटंट जे यातील वेळोवेळी होणाऱ्या टॅक्समधील बदल पाहत असतात त्यांच्याकडे चौकशी करावी. शेअर बाजारातील टॅक्स आकारणी पाहून काही जण असे ही म्हणतील हे असे काही असते आम्हाला आजच कळाले. त्यांच्यासाठी आणि ट्रेडिंगसाठी उतावीळ झालेले खूप जण या लेखमालिकेच्या पहिल्या दिवसापासून कधी एकदा चालू करू अशा मन:स्थितीत आहेत. त्यांना एकच सांगणे, ही फक्त बेसिक माहिती आहे. यावर तुम्ही ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करू शकत नाही. स्वतःचा अभ्यास चालू करा. दिवसातून १ तास वाचनासाठी द्या. प्रत्येक ठिकाणाहून नवीन माहिती मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या