PoK मध्ये हिंदुस्थान ‘बालाकोट’पेक्षाही काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत! इम्रान यांना भिती

1885

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्दबातल करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्याने पाकिस्तानचे रडगाणे सुरू आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पाकड्यांचा प्रयत्नही हवेत विरल्याचे दिसत असल्याने त्यांनी आता दुसराच डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त PoK च्या विधानसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थान PoK मध्ये काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असल्याची भितीही बोलून दाखवली.

खायचे वांदे, पण युद्धाची खुमखुमी कायम! PoK मधून इम्रान यांचा हिंदुस्थानला इशारा

PoK च्या विधानसभेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, ‘हिंदुस्थानने घेतलेल्या निर्णयाकडे आंतरराष्ट्रीय समुदाय दुर्लक्ष करत आहे. परंतु आम्ही हा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रीय मंचावर मांडत राहणार आहोत. तसेच दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यास त्याला आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असेल’, असेही ते म्हणाले.

PoK हातातून जाण्याची भिती
हिंदुस्थाने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्यानंतर आता पाकिस्तानला PoK हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. PoK मध्ये हिंदुस्थान बालाकोटसारखी कारवाई करण्याची शक्यता पंतप्रधान इम्रान यांनी बोलून दाखवली. हिंदुस्थानने PoK साठी वेगळी रणनिती तयार केली आहे. पुलवामानंतर हिंदुस्थानने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता, त्यापेक्षाही भयानक रणनिती PoK साठी आखली गेली आहे. एकीकडे PoK हातातून जाण्याची भिती असताना पाकड्यांची युद्धाची खुमखुमी मात्र कायम आहे. आमचे लष्कर तयार असून हिंदुस्थानला जशास तसे उत्तर देऊ अशी धमकी इम्रान यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी कलम 370 रद्द करून मोठी चूक केल्याचेही ते म्हणाले.

मोदींवर आगपाखड
तालिबान खान या नावाने बदनाम झालेल्या इम्रान खान यांनी स्वत:ला शांतातप्रिय म्हटले आहे. हिंदुस्थानसोबत शांतता राखण्यासाटी आम्ही चर्चा करण्यासही तयार होते, परंतु भाजपची विचारधारा वेगळी आहे, असेही ते म्हणाले. मोदींवरही त्यांनी टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या