संरक्षणमंत्र्यांच्या विधानानंतर पाकिस्तानला Pok ची चिंता, लष्करप्रमुखांचा कार्यकाळ वाढवला

1127

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जाण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही फसला आहे. अशात हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आता चर्चा फक्त Pok वर होईल हे ठासून सांगितल्याने पाकड्यांना भितीने बुडबुडा आला आहे. हिंदुस्थानसोबतच्या या तणावाच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी सल्लागारांशी चर्चा करून लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन लष्करप्रमुख सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेऊ शकणार नाही अशी भिती इम्रान खान यांना असावी. त्यामुळे सोमवारी इम्रान खान यांनी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सल्लागारांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. 2016 पासून ते पाकिस्तानचे लष्करप्रमुख आहेत.

राजनाथ सिंहांचा हुंकार
याआधी रविवारी हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले होते. पाकिस्तानसोबत आता यापुढील चर्चा फक्त Pokबाबत होईल असे राजनाथ सिंह म्हणाले होते. राजनाथ सिंह यांच्या या विधानामुळे जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर हिंदुस्थानला चंक्रव्ह्यूहमध्ये पकडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना खिळ बसली. आता Pok देखील हातचा जाईल अशी चिंता पाकड्यांना सतावत आहे. त्याचमुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी 15 ऑगस्टला Pok विधानसभेला संबोधित केले आणि हिंदुस्थानला युद्धाच्या पोकळ धमक्याही दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या