नेत्यांनी आमची लाज घालवली, जी-20 परिषदेवरून पाकिस्तानी नागरिक संतापले

हिंदुस्थानापासून फारकत घेऊन इस्लामी देश बनणाऱ्या पाकिस्तानला आज पश्चात्ताप करण्याची वेळ आली आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा घास आज त्याच दहशतवादाने घेतला असून देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. एकिकडे हिंदुस्थानात जी-20 शिखर संमेलन भरत असताना त्या संमेलनात पाकिस्तानला आमंत्रण नसल्याचा संताप तेथील सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. आमच्या नेत्यांमुळे ही वेळ आल्याचा आरोप पाकिस्तानी नागरिकांनी केला आहे.

हिंदुस्थानात जी-20 शिखर संमेलन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी सुमारे 19 देशांचे नेते हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. त्यात बांग्लादेशाचाही समावेश आहे. पण, पाकिस्तानला या संमेलनाचं आमंत्रण मिळालेलं नाही. त्यावर पाकिस्तानी नागरिक संतापले आहेत. एका यूट्युब चॅनलने नागरिकांचं मनोगत जाणून घेतलं तेव्हा सामान्य नागरिकांनी पाकिस्तानी नेत्यांवर या सगळ्याचं खापर फोडलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची परिस्थिती आता अशी राहिलेली नाही की हिंदुस्थानकडून त्याला आमंत्रण येईल. देशाची परिस्थिती बिघडली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान कधीच एक होऊ शकत नाहीत, कारण आपल्या नेत्यांना तिथे काहीच इज्जत नाही. आपल्यानंतर जन्माला आलेला बांग्लादेश जी-20मध्ये आमंत्रित आहे, कारण तो पुढे निघून गेला आहे. आपल्यावर ही वेळ आपल्या नेत्यांमुळे आली आहे, असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.