पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी Champions Trophy 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी ICC ने पाकिस्तानला स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान दिला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था सध्या दयनीय आहे. त्यामुळे त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लाहोरमधील ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियमचे नाव विकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गद्दाफी स्टेडियमच्या नामकरणाचे राइट्स PCB ने एका खासगी बँकेला पाच वर्षांसाठी विकले आहेत. तसेच हा करार 1 अब्ज पाकिस्तानी रुपयांमध्ये झाला आहे. त्यामुळे गद्दाफी स्टेडियम आता इथून पुढे कराचीच्या नॅशनल स्टेडियमप्रमाणे बँकेच्या नावाने ओळखले जाणार आहे. मात्र पीसीबीने या कराराबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पीसीबीने हा करार केल्याचे सांगितले जात आहे. या पैशांमधून पीसीबी देशातील तीन मुख्य स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवणार असल्याची शक्यता आहे.