अबब..! जगातील सर्वात उंच क्रिकेटपटू, उंची ऐकून व्हाल अवाक

2861

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान तुम्हाला माहिती असेलच. फर्स्ट क्लास आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा इरफान सर्वात उंच क्रिकेटर आहे. इरफानची उंची तब्बल सात फूट एक इंच एवढी आहे. परंतु आता त्याच्याहीपेक्षा उंच खेळाडू आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण पाकिस्तान सुपर लीग (PSL)ची फ्रेंचायजी लाहोर कलंदर्सने सर्वात उंच गोलंदाजाचा शोध घेतला आहे.

पाकिस्तान सुपर लीग (PSL)ची फ्रेंचायजी ‘लाहोर कलंदर्स’ने पाकिस्तानमधील सर्वात उंच गोलंदाजाचा शोधले असून या क्रिकेटपटूचे नाव आहे मोहम्मद मुदस्सर. मोहम्मद मुदस्सरची उंची सात फूट चार इंच इतकी आहे. 21 वर्षांचा मोहम्मद मुदस्सर हा मूळचा लाहोरचा आहे. ‘लाहोर कलंदर्स’ने त्याचा शोध घेतला असून तरुण आणि सर्वात उंच गोलंदाजला तयार करण्यासाठी खास प्रयत्न करत आहे.

मोहम्मद मुदस्सर याची आर्थिक परिस्थिती फारच हालाकीची आहे. ‘बॅटल ऑफ कलंदर्स’च्या अंतिम लढतीत मोहम्मद मुदस्सर हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. वेगवान गोलंदाजाला आला लाहोर कलंदर्सने निवडत आपल्या टीममध्ये घेतलं आहे. मोहम्मद मुदस्सर हा सध्या लाहोर कलंदर्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये एक वर्षांची ट्रेनिंग घेत आहे.

दरम्यान, सर्वात उंच गोलंदाजाबाबत नेटकरी काय म्हणतायंत पाहूया…

आपली प्रतिक्रिया द्या