पाकिस्तानी क्रिकेटरचा सामन्यादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न

43

सामना ऑनलाईन । कराची

पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूने क्रिकेट संघात निवड न झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमधील कायदे-आजम ट्रॉफीतील फर्स्ट क्लास मॅचदरम्यान लाहोर क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात प्रकार घडला आहे. गुलाम हैदर अब्बास असं या खेळाडूचं नावं आहे. हैदरने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. हैदर अंगावर पेट्रोल ओतून घेत असल्याचं पाहताच उपस्थितांनी त्याला थांबवलं.

गोलंदाज असलेल्या गुलाम हैदरने संघात निवड न झाल्याने कधीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला मिळणार नाही, या निराशेतून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. संघात निवडीसाठी लाच मागितल्याचा आरोपही हैदरने केला आहे. गुणवत्तेच्या आधारावर खेळाडूंची निवड केली जात नाही. संघात निवड न केल्याने निराश झालेल्या या क्रिकेटरने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच आत्महत्या केली तर एलसीसीए प्रमुख त्याला जबाबदार असतील, असही त्याने सांगितलं.

आपली प्रतिक्रिया द्या