पाकिस्तानी क्रिकेटपटूचा हिंदुस्थानी तरुणीसोबत निकाह

1573

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली याने हिंदुस्थानी तरुणीसोबत निकाह केला आहे. शामिआ अरझू असे नववधूचे नाव असून दुबईमध्ये त्यांचा निकाह पार पडला. दुबईतील अटलांटीस पाल्म हॉटेल 20 ऑगस्ट रोजी हा सोहळा पार पडला.

शामिआ अरझू ही हरयाणातील मेवात शहरातील रहिवासी आहे. शामिआने एरोनॉटीकलमध्ये बी.टेक केले असून ती एमिरेट्स एअलाईन्समध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. शामिआ व हसन अली यांची ओळख वर्षभरापूर्वी दुबई येथे झाली होती. त्यानंतर हसनने तिला लग्नाची मागणी घातलेली.

हसन अली याच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांनी हिंदुस्थानची टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत विवाह केला आहे. याव्यतिरिक्त झहीर अब्बास व मोहसीन हसन खान या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सासर देखील हिंदुस्थानातच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या