
पाकिस्तानातील एक महिला पत्रकार एका मुलाच्या कानाखाली मारतानाचा व्हिडीओ चित्रीत झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला पत्रकार छान तयार होऊन मेकअप वैगरे करून ईदच्या दिवशी रिपोर्टींग करत होती. ईद कशी साजरी केली जात आहे हे दाखवण्यासाठी ही महिला पत्रकार वार्तांकन करत होती. तिच्याभोवती लोकांची बरीच गर्दी झाली होती. यावेळी या पत्रकाराने एका मुलाच्या सणसणीत कानाखाली मारली.
A Pakistani reporter, Maira Hashmi(@MairaHashmi7) slaps a boy while reporting in Lahore, #Pakistan.
pic.twitter.com/SHg3NspuVo— Wᵒˡᵛᵉʳᶤᶰᵉ Uᵖᵈᵃᵗᵉˢ (@W0lverineupdate) July 11, 2022
ही महिला पत्रकार वार्तांकन करत असताना एक मुलगा उगाच कॅमेऱ्यात दिसण्याची धडपड करत होता. पत्रकाराला खेटून काही महिला, पुरुष लहान मुलं उभी राहिली होती. पत्रकार काय बोलतेय ते ऐकण्यासाठी आणि कॅमेऱ्यात दिसण्यासाठी पत्रकाराभोवती ही सगळी मंडळी उभी होती. पत्रकाराने तिचं बोलणं सोपताच सटाकsss करून बाजूला उभ्या असलेल्या मुलाच्या कानाखाली मारली. ती या मुलावर का भडकली होती हे कळू शकलं नाही मात्र काहींचं म्हणणं आहे की हा मुलगा काहीतरी वाईटसाईट बोलत होता, त्याचा राग आल्याने त्याच्या कानाखाली मारली. महिला पत्रकाराने जे केलं ते योग्य होतं का ? यावर तुमचे मत आम्हाला नक्की कळवा. प्रतिक्रियेसाठी आमचा ईमेल आयडी आहे [email protected]