
पाकिस्तानातील आर्थिक संकट हे महाभयंकर बनलं आहे. पाकिस्तानवर सध्याच्या घडीला 100 अब्ज कोटी डॉलर्सचे कर्ज असून तिथली परिस्थिती ही 1971 पेक्षा वाईट झाली आहे. पाकिस्तानला या आर्थिक वर्षात 21 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करायची आहे तर पुढच्या 3 वर्षांत 70 अब्ज कोटी डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करायची आहे. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला फक्त 4.3 अब्ज डॉलर्सची परदेशी गंगाजळी शिल्लक आहे. इतकी कमी परदेशी गंगाजळी आजवर कधीच नव्हती.
पाकिस्तानात अन्न-धान्याचा तुटवडा जाणवू लागला असून तिथे जीवनावश्यक वस्तूंसाठी मारामारी व्हायला लागली आहे. पाकिस्तान हा त्याच्या बौद्धीक दिवाळखोरी, सैन्याकडे असलेला दूरदृष्टीचा अभाव, राजकीय, औद्योगिक या सारख्या समस्यांमुळे ग्रासलेला असून या समस्यांनी पाकिस्तानचे आर्थिक संकट आणखी वाढवले आहे.