दिल्लीत पाकिस्तानचा मोठा कट उघडकीस, शस्त्रांसह 6 दहशतवाद्यांना अटक

तपास यंत्रणांनी पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी 6 लोकांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित हे दहशतवादी मॉड्यूल हिंदुस्थानात चालवत होते. या सर्वांची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलसाठी काम करणाऱ्या 6 पैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे छापे टाकत 6 लोकांना अटक केली. तपास यंत्रणांनी दावा केला आहे की, या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितले की, या दहशतवादी मॉड्यूलचे कनेक्शन डी कंपनीशी असल्याचे सांगितले जात आहे. हा दहशतवादी मॉड्यूल आयएसआयच्या संरक्षणाखाली एक मोठा कट रचत होते, असं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत तपास यंत्रणा अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या