पाकिस्तानात लग्नातून हिंदू मुलीचे अपहरण; धर्मांतर करून लावला निकाह

1629

पाकिस्तानमध्ये बळजबरीने लग्नसोहळ्यातून हिंदू मुलीचे अपहरण करून धर्मांतर करून तिचा मुस्लीम तरुणाशी निकाह लावल्याची संपातजनक घटना घडली आहे.  पाकिस्तानातील या घटनेने खळबळ उडाली आहे. लग्नसोहळ्यातून एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिला बळजबरीने तिला इस्लाम धर्म स्वीकाराहायला लावला. त्यानंतर तिचा एका मुस्लीम तरुणाशी निकाह लावण्यात आला.

सिंध प्रांतातील मटारी जिल्ह्यात शनिवारी लग्नसोहळ्यात काही लोकांनी मुलीचे अपहरण केले. यानंतर तिचे शाहरुख गुल नावाच्या तरुणासोबत निकाह लावण्नयात आला.या मुलीचे नाव भारती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनीही या मुलीच्या अपहरणात या व्यक्तींची मदत केली. अमेरिका येथील सिंधी फाऊंडेशनने म्हटले आहे की, दरवर्षी 12 ते 28 वयोगटातील सुमारे एक हजार तरुण सिंधी आणि हिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांचे बळजबरीने मुस्लीम तरुणांशी निकाह लावण्लयात येतो.

दरम्यान, गुरुद्वारा तंबू साहिबचे पुजारी भगवानसिंग यांच्या मुलीचे ही बळजबरीने अपहरण करून तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला होता. या घटनेनंतर हिंदुथानातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या