हिंदुस्थानशी युद्ध झाल्यास पाकिस्तानचा सपशेल पराभव, इम्रान खान यांची कबुली

imran khan

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आतापर्यंत अनेक वेळा युद्धे झाली आहेत. या युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानला पराभूत केले आहे. आताही जर कश्मीरवरून युद्ध झाले तर हिंदुस्थान आम्हाला सपशेल पराभूत करेल, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

हिंदुस्थानने कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने त्यावरून जगभरात अकांडतांडव सुरू केले आहे. त्यावरून एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इम्रान खान म्हणाले, ‘पारंपरिक युद्धात आमचा सपशेल पराभव होईल, पण अशा वेळी आम्ही हिंदुस्थानला शरण येऊ किंवा मग अणुयुद्धाचा पर्याय वापरून शेवटपर्यंत लढत राहू.’

‘मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. त्यामुळे काहीही झाले तरी पाकिस्तान पहिल्यांदा अणुयुद्ध सुरू करणार नाही. मी युद्धाच्या विरोधात आहे. ज्या समस्येसाठी युद्ध होते त्यापेक्षा भीषण परिणाम युद्धानंतर निर्माण होतात.’ अशी मखलाशीही इम्रान यांनी या मुलाखतीत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या