पाकिस्तानच्या प्रशासकीय अधिकारीपदी प्रथमच हिंदू युवती

pakistan-sana-hindu-origin

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या हिंदू तरुणीने देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे. 27 वर्षाच्या डॉक्टर सना रामचंद गुलवानी सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाली होती. परंतु त्यांच्या नियुक्तीवर मोहर लागली आहे. सना मूळची सिंध प्रांतातील शिकारपूरची रहिवासी आहे. त्यांनी सिंधच्या ग्रामीण भागात असूनही जिद्दीने यश मिळवले. ही जागा पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेअंतर्गत येते. सनाचे सरकारी शाळेत शिक्षण झाले आहे. सनाने पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतरमा बेनझीर भुत्तो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमध्ये पदवी संपादन केली आहे. तेव्हापासून त्या शल्यचिकित्सकही आहेत.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

आपली प्रतिक्रिया द्या