युद्ध केल्यास पाकिस्तानचा पराभव निश्चित, पाकच्या लेखिकेने केली पोलखोल

5228

जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हटविल्यापासून बिथरलेला पाकिस्तान सध्या युद्धाची भाषा करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील हिंदुस्थानला युद्ध करू अशी धमकी दिली आहे. मात्र युद्धाची खुमखुमी आलेल्या पाकिस्तानला प्रत्यक्षात मात्र युद्ध करणे परवडणार नसल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी लेखिका आयेशा सिद्दीका हीने आर्थिक कंगालीमुळे पाकिस्तान युद्ध करू शकत नसल्याचे सांगितले आहे.

आयेशाने Millitary INC. inside pakistan’s millitary economy हे पाकिस्तानी लष्करावर पुस्तक लिहले आहे. आयेशाला जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविण्याबद्दल विचारले असता तिने पाकिस्तान सध्या युद्ध करण्याच्या स्थितीत नसल्याचे म्हटले आहे. ‘मी पाकव्याप्त कश्मीरमधील एका मित्राशी बोलत होते. मी त्याला विचारले की आपले सैनिक युद्ध का करत नाही. तर त्याने सांगितले की जर युद्ध केले तर पाकिस्तान हरेल. सामान्य व्यक्तीला देखील आता समजलंय की ही हिंदुस्थानविरुद्ध युद्ध करण्याची योग्य वेळ नाही’, असे आयेशाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या