ट्रम्प यांच्या मध्यस्तीचे पाकड्यांनी केले स्वागत,हिंदुस्थानच्या भूमिकेने इमरान खान अस्वस्थ

25

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कश्मीरप्रश्नी मध्यस्ती करण्याच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच ट्रम्प यांच्या भूमिकेबाबत हिंदुस्थानच्या प्रतिक्रियेमुळे हैराण असल्याचे इमरान यांनी म्हटले आहे. गेल्या 70 वर्षापासूनची समस्या सोडवण्यासाठी ट्रम्प पुढाकार घेत आहेत. मात्र, हिंदुस्थानने त्यांची मध्यस्ती नाकारली आहे. कश्मीर समस्या अनुत्तरीत असल्याने कश्मीरच्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत इमरान यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.

कश्मीर समस्येबाबत हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट आहे. हिंदुस्थानचे कश्मीरबाबतचे धोरण स्पष्ट आहे. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. तसेच या प्रकरणी तिसऱ्या देशाची मध्यस्तता मान्य नसल्याचे हिंदुस्थानने अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाचीही मध्यस्तता स्वीकरण्याची गरज नसल्याचे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला कश्मीरप्रश्नी मध्यस्ती करण्याचे आवाहन केले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मोदी यांनी अशा प्रकराचे कोणतेही आवाहन ट्रम्प यांना केले नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या