पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानची चिंता, अमेरिकेत इम्रान यांची बकबक

1648

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा कश्मीर राग आळवला आहे. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करण्यात आल्याचा मुद्दा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर उपस्थित करण्यात असून या प्रकरणी त्यांना मध्यस्थी करण्याची विनंती करणार असल्याचे इम्रान खान म्हणाले. न्यू यॉर्कमध्ये ‘काउंसिल फॉर फॉरेन रिलेशन’मध्ये संबोधित करताना त्यांनी जम्मू-कश्मीरचा मुद्दा छेडला. यावेळी त्यांनी पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानची चिंता असल्याची बकबकही केली.

न्यू यॉर्कमध्ये ‘काउंसिल फॉर फॉरेन रिलेशन’मध्ये बोलताना इम्रान खान म्हणाले की, जम्मू-कश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात आले आहे. कश्मीरच्या परिस्थितीमुळे क्षेत्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. जम्मू-कश्मीरमधून कर्फ्यू हटवला गेला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांनी हिंदुस्थानवर दबाव टाकावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच याशिवाय चर्चा शक्य नसल्याचेही ते म्हणाले.

…म्हणे पीओकेचा दुष्प्रचार
पीओकेमध्ये अत्याचारांची सीमा गाठणारे पाकिस्तान आता तेथे हिंदुस्थान दुष्प्रचार करत असल्याचे बोलत आहे. इम्रान खान यांनी भाजप सरकार आरएसएसचा अजेंडा चालवत असल्याचा तथ्यहिन आरोपही केली. पुलवामा हल्ल्यानंतरही हिंदुस्थानने लगेच पाकिस्तानला दोषी ठरवले होते, असा आरोपही त्यांनी केला. दोन्ही देश दहशतवादाशी लढत असल्याचे सांगत त्यांनी मगरीचे अश्रूही ढाळले. तसेच दोन्ही देश अणूसंपन्न असून आमने-सामने आल्याने काहीही होऊ शकते असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या