हिंदुस्थानच्या ४३९ मच्छिमारांना पाकिस्तान सोडणार

32

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानच्या कारागृहातील ४३९ हिंदुस्थानी मच्छिमारांना सोडण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. येत्या २६ डिसेंबरला यातील २२० मच्छिमारांची सुटका करण्यात येणार असून इतर २१९ जणांना ६ जानेवारीला मुक्त करण्यात येणार आहे. हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील तणाव निवळावा या सदभावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दरम्यान, मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी संपल्याने पाकिस्तान त्यांना हिंदुस्थानात पाठवत असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानी दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानच्या कारागृहात ५१८ पाकिस्तानी कैदी आहेत. यापैकी १३२ मच्छिमार आहेत. हिंदुस्थाननेही सदभावनेतून त्यांची सुटका करावी, असे अपील पाकिस्तान हिंदुस्थानला करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या