हिंदुस्थान विरोधातील मोर्चावर पाकिस्तानमध्ये ग्रेनेड हल्ला, सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मीने घेतली जबाबदारी

1411

बुधवारी पाकिस्तानच्या कराचीमध्ये कराचीच्या रॅलीत ग्रेनेड हल्ला झाला ज्यामध्ये कमीतकमी 30 लोक जखमी झाले आहेत. हिंदुस्थानने कश्मिरातील कलम 370 हटविण्याच्या विरोधात ही रॅली काढण्यात आली. 5 ऑगस्टला त्याचा पहिला वर्धापन दिन होता ज्याच्या विरोधात कराची येथे हा मोर्चा काढण्यात आला.

ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कराचीमधील एका आरोग्य अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला माहिती दिली. कराचीचे पोलीस प्रमुख गुलाम नबी मेनन यांनी रॉयटर्सला सांगितले, या रॅलीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता, ज्यात बरेच लोक जखमी झाले होते. सिंधुदेश रेव्होल्यूशनरी आर्मी (एसआरए) नावाच्या संस्थेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही एक फुटीरतावादी संघटना आहे, जी गेल्या काही महिन्यांत सक्रिय झाली आहे.

जून महिन्यात या भागात तीन स्फोट झाले, त्याची जबाबदारी एसआरएने केला आहे. ज्यामध्ये 2 जवानांसह 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. सिंध प्रांत कराचीपासून वेगळा करावा अशी या संघटनेची मागणी आहे. या प्रांताची राजधानी कराची आहे. एसआरएने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीबरोबर युती करण्याची घोषणा देखील केली आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मी ही दक्षिण-पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागाला स्वातंत्र्य मिळावे अशी मागणी करणारी एक संस्था आहे.

आपली प्रतिक्रिया द्या