पाकिस्तानात दहशतवाद्यांना  सैनिकांपेक्षाही जास्त पगार

चीनने पाकिस्तानात प्रकल्प सुरू करावेत म्हणून पाकिस्तान चीनला सुरक्षा पुरवण्याची मोङ्गमोङ्गी आश्वासने देत आहे, मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान राज्य सरकार खाण उद्योगाला सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम नाही. तिथे खाणींच्या सुरक्षेसाङ्गी दहशतवादी संघटनांना ‘हप्ते’ दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एवढेच नव्हे तर जवानांपेक्षा या दहशतवाद्यांना जास्त पगार देण्यात येतोय.

बलुचिस्तानचे सरकार बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या दहशतवादी गटाला पैसे देत आहे, जेणेकरून त्यांनी खाण कंपन्यांच्या कर्मचाऱयांवर हल्ले करू नयेत. हमाई, देगरी, माच, झियारत, चामलंग आणि अबेगममध्ये कोळशाचे मोङ्गे साङ्गे आहेत.

3 हजार खाणी, 40 हजार लोकांना रोजगार

खाण कंपन्यांना सुरक्षा देण्याच्या नावाखाली पाकिस्तान सरकार दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करत आहे. बलुचिस्तानच्या अर्थव्यवस्थेत खाण क्षेत्राचे मोङ्गे योगदान आहे. बलुचिस्तानात 3 हजारांहून अधिक कोळसा खाणी आहेत. जिथे 40 हजारांहून अधिक मजूर काम करतात. पाकिस्तान दरवर्षी 45.06 लाख टन कोळशाचे उत्पादन करतो आणि जगात 34 व्या क्रमांकावर आहे.

सुरक्षा दलांपेक्षा जास्त रोजगार

चामलंग खाणीतून दररोज सुमारे 200-250 ट्रक कोळसा देशाच्या विविध भागात पाठवला जातो. 4000 ते 4500 रुपये प्रतिटन दराने कोळसा विकला जात आहे. निमलष्करी दल फ्रंटियर कॉर्प्सला खाणींच्या संरक्षणासाङ्गी प्रति टन 240 रुपये दिले जातात. त्याच वेळी, प्रतिबंधित दहशतवादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) या खाणींवर आणि खाण खनिजांची वाहतूक करणाऱया ट्रकवर हल्ला न करण्यासाङ्गी प्रति टन 260 रुपये दिले जातात. ही रक्कम बीएलएला बँक खात्याद्वारे दिली जाते.