पाकड्यांचे मिसाईलही वाकडे, सुटलेही पाकिस्तानात आणि फुटलेही पाकिस्तानात

pakistan-missile

अमेरिकेत जो बायडेन 46 वें राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत होते, त्या आधी काही तासांपूर्वीच पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाइल शाहीन-3 चे परीक्षण केल्याची घोषणा केली. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी सांगितले की शाहीन-3 तंत्रज्ञान आणि वेपन सिस्टममध्ये आधुनिक आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी या मिसाइल परीक्षणासाठी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

मात्र हे मिसाइल परीक्षण आता वादात सापडले आहे. याचे परीक्षण बलूचिस्तानच्या डेरा गाजी खान येथून करण्यात आले होते. बलूचिस्तानच्या रिपब्लिकन पक्षाने म्हटलं आहे की, शाहीन-3 डेरा मिसाइल बुग्तीच्या रहिवाशी भागात येऊन पडले. ज्यामुळे काही घरांचे नुकसान झाले असून काही लोक जखमी झाले.

बलूचिस्तानने रिपब्लिकन पक्षाने ट्वीट करून माहिती दिली आहे, पाकिस्तान आर्मीने बुधवारी शाहीन-3 मिसाइलचे परीक्षण केले. हे मिसाइल डेरा गाजी खानच्या राखी भागातून डागण्यात आले आणि डेरा बुग्तीच्या रहिवाशी भागात पडले.

बलूचिस्तानमधील रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ते शेर मोहम्मद बुग्ती यांनी मिसाइल परीक्षणावेळी काही लोक जखमी झाल्याचे सांगितले. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘पाकिस्तानच्या लष्कराने बलूचिस्तानला प्रयोगशाळा बनवून ठेवले आहे. लष्काराने शाहीन 3 चे परीक्षण डेरा गाजी खान भागात केले आणि ते डेरा बुग्ती भागात ते पडले. हा संपूर्ण रहिवासी भाग आहे. हे मिसाइल लोकांवरच डागण्यात आले. यामधे अनेक घरांचे नुकसान झाले असून लोक जखमी झाले आहेत.’’

पुढे ते म्हणाले की, ‘बलूचिस्तान आमची मातृभूमी आहे हे प्रयोगशाळा नाही. आम्ही पीडित देशांना अपील करतो की त्यांनी पाकिस्तान सैन्याच्या मिसाइल परीक्षणा विरोधात आवाज उठवावा.’

पाकिस्तानने मिसाइल परीक्षण करण्यासाठी हाच दिवस आणि वेळ निवडली यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने हिंदुस्थानवर दबाव निर्माण करावा हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार हिंदुस्थानवर बिनबुडाचे आरोप करत असतात. मात्र हिंदुस्थानने नेहमी अशा आरोपांचे खंडन करून पाकिस्तानचे पितळ उघड पाडले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या