पाकड्यांनी हिंदुस्थानला दिली अणुहल्ल्याची धमकी

35

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या कुरापती काढणाऱ्या पाकड्यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हिंदुस्थानला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी शनिवारी हिंदुस्थानी लष्करप्रमुख बिपीन रावत यांना प्रत्युत्तर म्हणून अणुहल्ल्याची धमकी दिली आहे.

लष्करप्रमुख रावत यांनी १२ जानेवारी रोजी असं म्हटलं होतं की, हिंदुस्थानी सेना पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या दिखावेगिरीला प्रत्युत्तर देण्यास संपूर्णपणे सज्ज आहे. सरकारची परवानगी मिळली तर आमचे जवान सीमेपार जाऊन कोणतीही मोहीम फत्ते करू शकतात. दोन्ही देश परस्परसंबंध सुधारण्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्नशील आहेत. पण, जम्मू-कश्मीरमध्ये सतत होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे वातावरण बिघडत आहे.

यावर उत्तर देताना ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी ट्वीट केलं. हिंदुस्थानी लष्करप्रमुख यांचं वक्तव्य अतिशय बेजबाबदार असून त्यांच्या पदाला शोभणारं नाही. हे अणुयुद्धाला आमंत्रण देण्यासारखं आहे. जर त्यांना (हिंदुस्थान) असं वाटतं की ते आमच्या (पाकिस्तान) क्षमतांची परीक्षा करू शकतात तर त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर होईल.

आपली प्रतिक्रिया द्या