कोहलीला सफाई कर्मचारी म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला नेटकऱ्यांनी तुडवले

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी खेळाडूंची मैदानावरील तू-तू-मै-मै आपण अनेकवेळा पाहिली आहे. आता मैदानाबाहेरही असेच चित्र दिसून येत आहे, मात्र ही तू-तू-मै-मै खेळाडूंमध्ये नाही तर चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले आहे. १२ सप्टेंबरला पाकिस्तान आणि वर्ल्ड ११ संघामध्ये सामना खेळवण्यात आला. लाहोरच्या गद्दाफी मैदानावर हा सामना रंगला. या सामन्यात भलेही पाकिस्तान विजयी झाला असो, मात्र पाकिस्तानच्या चाहत्याने केलेल्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.

पाकिस्तानी चाहत्याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत कोहलीला सफाई कर्मचारी म्हटले आहे. युझरने कोहलीच्या फोटोसोबत, पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड ११ सामन्यादरम्यान मैदानावर सफाई करताना सफाई कर्मचारी, असे कॅप्शन दिले आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच झापले आहे. एका युझरने लिहिले आहे की, ‘जितका पैसा तुमच्या पाकिस्तानमध्ये नसेत तेवढा पैसा आम्ही दान करतो’. तर एकाने कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, बाप हा बाप असतो आणि बेटा हा बेटा असतो, असा टोला लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या