दिल्लीतील खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे

दिल्लीतील खान मार्केटमध्ये रात्री एकच्या सुमारास काही समाजकंटकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे लगावले. याप्रकरणी पोलिसांनी तीन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

रात्री एकच्या सुमारास खान मार्केटमधील मेट्रो स्थानका जवळ काही लोकं पाकिस्तान झिंदाबादचे नारे देत असल्याचा फोन तुघलक रोड पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या लोकांना ताब्यात घेतले. ते सर्व जण युलु बाईकवरून परिसराचा फेरफटका मारत होते.

चौकशी दरम्यान त्यांनी युलु बाईकवरून शर्यत लावली होती व त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या देशांची नावं दिली होती. त्यातील एकाला त्यांनी पाकिस्तान हे नाव देखील दिले होते. त्याला हाक मारताना आमच्यातील काहिंनी त्याला पाकिस्तान म्हटल्याने हा गोंधळ झाल्याचे त्या तरुणांनी पोलिसांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या