पाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ !

30

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आयसीसी वर्ल्ड कप सामन्यातील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा हायवॉल्टेज सामना आज मॅचेस्टरमध्ये रंगणार आहे. हिंदुस्थाननेच हा सामना जिंकावा यासाठी देशभरातील अनेक राज्यात नागरिक होम हवन. व्रत वैकल्ये करत असतानाच पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कॅप्टन सरफराज अहमद याचा मामा महबूब हसन याने मात्र ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ असे सांगत इंडियन टीमवर विश्वास व्यक्त केला आहे.

एवढेच नाही तर या सामन्यात पाकिस्तान नाही तर हिंदुस्थानलाच जिंकताना पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर माझा भाचा उत्तम कामगिरी पार पाडेल जेणेकरून त्याचे कॅप्टनपद कायम राहील. असे सांगत मामा हसन यांनी सरफराजप्रती प्रेमही व्यक्त केले आहे. हसन यांचे हे हिंदुस्थानप्रेम बघून अनेकजण अचंबित झाले आहेत. पण खरं तर हसन जरी सरफराजचे मामा असले तरी ते हिंदुस्थानीच आहेत. त्यांच्यासाठी देशाहून दुसरे कोणी मोठं होऊ शकत नाही. ते उत्तर प्रदेशमधील इटावा शहरात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. सरफराज अनेकवेळा आपल्या मामाला भेटण्यासाठी येथे येऊनही गेला आहे. याआधीही हसन यांनी अनेकवेळा हिंदुस्थानी संघाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली होती. सरफराजचे आजोबा हाजी वकील अहमद उत्तरप्रदेशमधील फतेहपूर येथे राहतात. फाळणीनंतर त्या हिंदुस्थानमध्येच राहील्या. पण सरफराजच्या आईने पाकिस्तानी तरुणाबरोबर पळून जाऊ निकाह केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या