‘KBC’च्या नावाखाली पाकड्यांची नापाक खेळी, संरक्षण मंत्रालयाचा इशारा

2268

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करण्याचा निर्णय हिंदुस्थानने घेतल्यानंतर पाकिस्तानकडून खोट्या बातम्यांचा प्रसार अद्यापही सुरू आहे. आता पाकिस्तानने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) याचा वापर करून लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. खोट्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. यासंबंधी संरक्षण मंत्रालयाने सुरक्षेची काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या सायबर सेलने सांगितले की, ‘पाकिस्तानमधील हॅकर आणि हिंदुस्थानविरोधी लोक केबीसीच्या लोकप्रियतेचा फायदा उठवत आहे. याद्वारे लोकांना व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडून केबीसीबाबत चुकीची माहिती देण्यात येत आहे.’ यासंबंधी संरक्षण मंत्रालयाने ज्या ग्रुपद्वारे व्हॉट्सअॅप चालवण्यात येते अशा पाकिस्तानमधील लोकांच्या नंबरचाही उल्लेख केला आहे.

पाकिस्तानशी संबंधीत असा कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी असाल तर तात्काळ त्यामधून रिमूव्ह व्हा, असे आवाहन संरक्षण मंत्रालयाने केले आहे. तसेच जे नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह आहात तेच नंबर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये जोडू शकतील अशी सेटिंग करून घ्या, असेही संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

पाकड्यांचा खोटा प्रचार सुरुच
370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती विकोपाला गेली आहे, तिथे अराजकता पसरली असल्याचे खोटे मेसेज पसरवले गेले. यादरम्यान संरक्षण मंत्रालयाशी संलग्न संस्थांनी 200 सैन्य अधिकाऱ्यांचे खोटो ट्विटर अकाऊंटही बंद केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या