3 बायका असणाऱ्याला करायचेय चौथे लग्न, विवाहेच्छुक तरुणीसमोर फक्त एकच अट

Photo Credit- Daily Pakistan Global youtube channel

पाकिस्तानमध्ये एक तरुण सध्या भलताच चर्चेत आला आहे. या तरुणाची आतापर्यंत 3 लग्नं झाली असून त्याला आता चौथं लग्न करायची हुक्की आली आहे. या तरुणाचं वय फक्त 22 वर्ष इतकं असून त्याच्या तीनही बायका त्याच्यासोबतच राहतात. चौथं लग्न करण्यासाठी या तरुणाने एक अट ठेवलेली आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या तरुणीसोबत आपण लग्न करायला तयार आहोत असं त्याचं म्हणणं आहे.

लग्नाळू अदनान

अदनान नावाचा हा तरुण सियालकोटमध्ये राहातो. डेली पाकिस्तान ग्लोबलने अदनान आणि त्याच्या बायकांची मुलाखत घेतली आहे.  22 वर्षांच्या अदनानचं पहिला निकाह तो 16 वर्षांचा असताना झाला होता. 20 वर्षांचा असताना त्याचं दुसरं लग्न झालं. गेल्या वर्षी अदनानने तिसरं लग्न केलं होतं. आता त्याला वाटायला लागलं आहे की आपण चौथं लग्नही करून टाकावं. मात्र त्याने यासाठी अट घातली आहे की, जी मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार असेल तिच्या नावातील पहिलं अक्षर हे इंग्रजीतील S असावं.

3 बायका 5 मुलं

अदनानच्या बायकांची नावं शुंबल, शुबाना आणि शाहिदा आहेत. या तिघींची नावं इंग्रजी अक्षर S पासून सुरू होत असल्याने चौथ्या बायकोचंही नाव याच इंग्रजी अक्षराने सुरू होणारं असावं असं अदनानने म्हटलंय. अदनानला एकूण 5 मुलं आहेत. शुंबलपासून त्याला 3 मुलं आहेत. शुबानापासून त्याला 2 मुलं आहेत. यातील एक मूल शाहिदाने दत्तक घेतलं आहे.

अदनान म्हणतो होऊ दे खर्च!

अदनानने मुलाखतीमध्ये सांगितलंय की, तो 6 बेडरुमच्या घरात राहातो. त्याच्या बायका त्याची आलटून-पालटून देखभाल करतात. एक बायको जेवण बनवते, दुसरे कपडे धुते आणि तिसरी त्याच्या बुटांना पॉलिश करते. घरखर्चावर महिन्याला दीड लाख पाकिस्तानी रुपये खर्च होतात असं अदनानचं म्हणणं आहे. आपल्यासाठी खर्च ही समस्या नसून आपण चौथं लग्न करायला तयार असल्याचं अदनानचं म्हणणं आहे. पहिल्या बायकोशी लग्न केल्यानंतर आपलं भाग्य उजळलं होतं असंही अदनानचं म्हणणं आहे. आपल्या तीनही बायका या आपल्यासाठी चौथी बायको शोधत असल्याचं अदनानने सांगितलंय.

आपली प्रतिक्रिया द्या