अफवेमुळे पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधानांना मृत घोषित केले, जगभर फजिती

18199

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बोरिस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना पाकिस्तानी मीडियाने मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी दिल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे पाकिस्तानी मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

गेल्या आठवड्यात इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर जॉन्सन यांना आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयाने अतिदक्षता विभागात हलवले त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आले होते. मात्र नंतर रुग्णालयाने त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी आयसीयूत हलविल्याचे सांगितले होते. मात्र त्याचवेळी बीबीसी या वृत्तवाहिनीच्या एका फेक ट्विटर अकाऊंटने बोरिस जॉन्सन यांच्या निधनाची बातमी दिली. त्याचा आधार घेत पाकिस्तानी मीडियाने देखील त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या दिल्या.

पाकिस्तानी मीडियाने बीबीसीच्या ज्या अकाऊंटच्या आधारे ही बातमी दिली आहे त्या अकाऊंटला अवघे शंभर फॉलोअर्स आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील नेटकऱ्यांनी पाकिस्तानी मीडियाच्या अकलेचे वाभाडे काढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या