पाकिस्तानच्या या मंत्र्याला मुसलमान अंगरक्षक नकोत

26

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानात हिंसाचारामध्ये वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या एका मंत्र्याने आपल्याला मुसलमान अंगरक्षक नको असे म्हटले आहे. त्यामुळे वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकच नाही तर सत्तेमध्ये असणारे राजकीय नेतेही हादरले आहेत हे दिसून येत आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी हत्या करण्याची धमकी दिल्याने राणा सनाउल्लाह यांनी मुस्लीम अंगरक्षक नको ही भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांच्या धमकीनंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे, मात्र मंत्री या सुरक्षेबाबत समाधानी नाही.

पाकिस्तानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राणा सनाउल्लाह यांनी आपल्या सुरक्षेमध्ये मुस्लीम धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मिय लोकांना सुरक्षेमध्ये तैनात करण्याची मागणी केली आहे. सनाउल्लाह यांनी पोलिसांकडे मुस्लीम धर्म वगळता हिंदु, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची यादी मागितली आहे. त्यांच्या या मागणीमुळे सुरक्षेसाठी अन्य धर्मिय रक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र त्याआधीच सनाउल्लाह यांनी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या खासगी ख्रिश्चन संस्थेकडून रक्षकांची नियुक्ती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या