Video पाकिस्तानच्या मंत्र्याला लंडनमध्ये लाथा-बुक्के मारत तुडवला

2417

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांच्यावर लंडनमध्ये हल्ला करण्यात आला आहे. त्यांना बेदम मारण्यात आलं असून त्यांच्यावर अंडी फेकून मारण्यात आली आहे. रशीद हे पाकिस्तानमधील राजकीय पक्ष असलेल्या अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आहे. लंडनमधल्या आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रशीद आले होते. हा कार्यक्रम संपवून बाहेर निघाल्यानंतर त्यांना बडवण्यात आलं. आसिफ अली खान आणि समाह नाज यांनी रशीद यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दोघांनी हा हल्ला का केला ते जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

आपली प्रतिक्रिया द्या