व्हि़डिओ- हिंदुस्थानी लष्कराकडून पाकिस्तानी चौक्या उध्वस्त!

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी लष्करानं कश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरीविरोधात कडक कारवाई करत नौशेरा येथील पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त केल्या आहेत. लष्करानं या कारवाईचा व्हिडिओ आता प्रसारीत केला आहे. हिंदुस्थानी सेनेचे मेजर जनरल अशोक नरुला यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नरुला यांनी सांगितलं की, ‘पाकिस्तानी सेना आपल्या चौक्या आणि बंकर यांच्या मदतीन दहशतवाद्यांना हिंदुस्थानात घुसखोरी करण्यास मदत करत आहे. त्यामुळे लष्करानं खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे.’

कारवाईचा हा व्हिडिओ ३० सेकंदांचा आहे. यात पाकिस्तानी चौक्यांच्या उध्वस्त होण्याची दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. ‘ही कारवाई घुसखोरी करणाऱ्यांविरोधात होती. दहशतवादविरोधी अभियानाचा भाग म्हणून ही कारवाई केली. कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई आहे.’, अशी माहिती नरुला यांनी दिली. घुसखोरी करण्यास मदत केल्यास अशा प्रकारची पुढेही करण्यात येईल असा इशाराही हिंदुस्थानी लष्करानं पाकिस्तानला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या