पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर दहशतवाद्यांचा डोळा

37

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या कोल्ड स्टार्ट रणनीतीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद अब्बासी यांनी गेल्या आठवडय़ात म्हटले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या अण्वस्त्र्ासज्जतेचा उल्लेख केला होता. मात्र, पाकिस्तानातील अण्वस्त्रे धोक्यात असल्याचा अहवाल अमेरिकेतील फेडरेशन ऑफ अमेरिकन साईस्टिंट (एफएएस) या संस्थेने दिला आहे. दहशतवाद्यांकडून ही अण्वस्त्रं चोरली जाण्याचा धोका आहे. तसे झाल्यास मोठा अनर्थ ओढवेल, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानने  नऊ  ठिकाणी अण्वस्त्रे ठेवल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या