छत्रपती व आई जिजाऊंबाबत बदनामीजनक वक्तव्य करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करून निलंबित करा!

2800

पालम येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक जगन्नाथ काळे (बॅच नं. 1346) यांनी छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊबद्दल अपशब्द बोलल्याची ऑडीओ क्लिप प्रसारमाध्यमात व्हायरल झाली आहे. यामुळेे पालम शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील शेकडो शिवप्रेमींनी मोर्चा काढत तहसीलदार पालम व पोलीस निरीक्षक पालम यांना निवेदन देऊन सदरील पोलिसावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

संतप्त शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व आई जिजाऊ बद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोलिसाला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर दुकानदारांनी संपूर्ण बाजारपेठ स्वयंस्फुर्तीने काही वेळातच बंद केली.

दरम्यान, पोलीस आणि तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर गजानन रोकडे, कल्याण सिरस्कर, गंगाधर सिरस्कर, शरद सिरस्कर, अनिल सिरस्कर, भगवान सिरस्कर, नागेश रोकडे, हनुमान रोकडे, व्यंकटेश रोकडे, विलास चव्हाण, विनोद घोरपडे, राजकुमार गडम, प्रमोद दुधाटे, गजानन देशमुख, विशाल रोकडे यांच्यासहित अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या