पॅलेस्टाईनच्या सुंदरीने इस्राएली सैनिकांना भुलवले

1099

इस्राईल पॅलेस्टाईन संघर्षात आता हनी ट्रॅपचा वापर सुरू झाला आहे. पॅलेस्टाईनने इस्राईली सैनिकांना सुंदर तरुणींचे नग्न फोटो पाठवून त्यांच्याशी मैत्री वाढवली आणि त्यांना एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. या ऍपच्या माध्यमातून पॅलेस्टाईन इस्राईलच्या सैनिकांचे फोन हॅक करत.

पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेने हे हा हनी ट्रॅप रचला होता. परंतु हे जाळे असल्याचे इस्राएलच्या सैनिकांच्या लक्षात आले. फोन हॅक करण्याचा पॅलेस्टाईनचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे इस्राएली अधिकार्‍यांनी सांगितले. पॅलेस्टाईनचे अधिकारी एका मुलीच्या रुपाने चॅट करतात. तोडक्या मोडक्या हिब्रु भाषेत बोलतात. तसेच आपले मादक आणि नग्न फोटो ते इस्राएली सैनिकांना पाठवतात. नंतर अधिक फोटो आणि व्हिडीओसाठी ते एका ऍपची लिंक पाठवतात. नंतर या लिंकवर केल्यास सैनिकाचा पूर्ण फोन हॅक होतो. हॅक झाल्यानंतर संपूर्ण फोनमधील डेटा चोरता येतो. तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्डिंग करून सर्व माहिती मिळवता येते. इतकेच नव्हे तर या मोबाईलमधून मेसेज आणि कॉलही करता येतात. ही चाल इस्राएलच्या अधिकार्‍यांना आधीच कळाली होती. शत्रूला बेफिकीर ठेवण्यासाठी त्यांनी तीन महिने यावर काहीच कारवाई केली नाही.  अधिकार्‍यांनी सैनिकांना फोन जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या