पालघरमध्ये क्रीडानगरीसाठी 50 एकर जागा देणार, शिवसेना खासदार राजेंद्र गावीत यांचे आश्वासन

489

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव दणक्यात पार पडला. बोर्डी येथील मदनराव सावे क्रीडा संकुल येथे हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आश्वासन दिले की, पालघर येथे क्रीडानगरी उभारण्यासाठी 50 एकर जागा देणार.

या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा अजय ठाकूर, आनंद मिनेजेस, आमदार विनोद निकोले, उद्योजक अशोक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या क्रीडा महोत्सवात 3200 खेळाडूंनी सहभाग घेतला. आगाशी उंबरगोठण येथे पुढील क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या