कोरोनामुळे पोलीस नाईक आमिन मुलाणी यांचा मृत्यू, मुलीचे लग्न पाहण्याची इच्छा राहिली अधुरी

451

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक आमिन आप्पा मुलाणी (वय 50 रा.पोलीस कॉलनी पंढरपूर) यांचं आज कोरोनामुळे निधन झालं आहे. मुलाणी यांनी नुकतंच आपल्या मुलीचं लग्न जमविले होते कोरोनाचा कहर कमी झाला की धुमधडाक्यात लग्न लावून देण्याचे स्वप्न होते. मात्र कोरोनामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

गेल्या आठवड्यात मुलाणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे.

पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून मुलाणी यांचे दुःखद निधन झाले आहे तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलाणी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या