पंढरपूर – कोरोनामुळे डॉक्टर सचिन दोशी यांचा मृत्यू

पंढरपूर येथील डॉक्टर सचिन रामलाल दोशी ( खटावकर) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील एकूण बळींची संख्या आता 28 इतकी झाली आहे.

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप कायम असून शुक्रवारी पहाटे एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली. शहरात कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू होण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे. डॉ. सचिन रामलाल दोशी (खटावकर ) यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते . मात्र उपचारादरम्यान अखेर आज ( शुक्रवारी ) पहाटे पुण्यात नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. दोशी हे केवळ चाळीस वर्षाचे होते. तालुक्यातील कासेगावमध्ये ते वैद्यकीय सेवा देत असत. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे .

आपली प्रतिक्रिया द्या