मंदिर समितीचा वाद शिगेला, वारकऱ्यांनी माऊलींची पालखी रोखली

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने वारकऱ्यांनी समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच वारकऱ्यांनी सरगम चौकात ठिय्या आंदोलन करत माऊलींचा पालखी सोहळा रोखून धरला. दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर पालखी सोहळा सुरू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मंदिर समिती राजकीय असल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रोखून धरला आहे. सरगम चौकात जमलेल्या वारकऱ्यांनी कराड येथील भाजपचे नेते आणि समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना हटवण्याची मागणी केली आहे. ३ लाखांपेक्षा जास्त वारकरी रस्त्यावर उतरले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या