जेव्हा नेहरुंच्या बेडवर अंगरक्षक झोपला, प्रियंका गांधीने सांगितला किस्सा

2246

हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर विविध पक्षांनी आणि नेत्यांनी पंडित नेहरु यांना आदरांजली देण्यात येत आहे. नेहरुंच्या 130 व्या जयंतीनिमित्त प्रियंका गांधी-वढेरा यांनीही एक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘जेव्हा ते पहाटे 3 वाजता कामावरून परत आले तेव्हा मी पाहिले की त्यांच्या बेडवर त्यांचा बॉडिगार्ड झोपी गेला होता. त्यांनी (नेहरू) गार्डच्या अंगावर पांघरून टाकले आणि स्वत: शेजारील खुर्चीवर झोपी गेले’, अशी आठवण प्रियंका गांधी-वढेरा यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रियंकांच्या ट्वीटला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

प्रियंकांसह राहुल गांधी यांनीही नेहरुंच्या जयंतिनिमित्त ट्वीट केले आहे. पहिले पंतप्रधान, एक राष्ट्रसेवक, दूरदर्शी, विद्वान, संस्थांचे निर्माते आणि आधुनिक हिंदुस्थानच्या महान रचनाकारांपैकी एक पंडित जवाहरलाल नेहरु यांना आदरांजली, असे राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पंडित नेहरुंच्या जयंतिनिमित्त काँग्रेस पक्षानेही ट्वीट करून त्यांनी आदरांजली दिली आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी नेहरुंनी संघर्ष केला आणि खंभीर लोकशाहीसह आधुनिक देशासाठी कार्य केले. नेहरुंनी देशाला नवीन रस्ता दाखवला, असे ट्वीट काँग्रेस पक्षाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या