
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत रसिकांना सकाळचे खास राग अत्यंत शांत, नैसर्गिक वातावरणात अनुभवता यावेत या संकल्पनेतून दर महिन्याला पंचम निषाद संस्थेतर्फे ‘प्रातःस्वर’ ही मैफल आयोजित केली जाते. ‘प्रातःस्वर’मध्ये आजवरच्या 128 मैफली झाल्या आहेत. यामध्ये दरवेळी एक नवीन कलाकार सहभागी होतो.
मैफलीच्या 129 व्या भागात कोलकाता येथील ख्यातनाम सरोद वादक पंडित नरेंद्रनाथ धर यांच्या कलेचा आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता येणार आहे. त्यांना मुकुंद देव तबलासाथ करतील. मैफल रविवार, 28 मे 2023 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिराच्या पुल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रांगणात रंगणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे पंचम निषाद संस्थेचे संस्थापक, संचालक शशी व्यास यांनी सांगितले.