पनीर क्रिस्प रोल

31

हल्ली घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले की हॉटेल सारखाच थ्री कोर्स मेन्यु बनवायची फॅशन आली आहे. या मेन्युत मेन कोर्स पेक्षा स्टार्टर जास्त महत्त्वाचे असतात. नॉनव्हेजमध्ये स्टार्टरचे बरेच प्रकार करता येतात. पण व्हेज म्हटलं की स्टार्टरला काय करायचा हा मोठा प्रश्नच असतो. त्यामुळे आम्ही आज आपल्याला व्हेजची एक सोप्पी आणि चविष्ट डिश दिली आहे. ही डिश तुमच्या पार्टीतलं एक बेस्ट स्टार्टर होऊ शकते.

साहित्य.. पनीरचे छोटे तुकडे, सेझवॉन सॉस, टोमॅटो सॉस, बारिक चिरलेली शिमला मिरची व कोबी, आलं लसून पेस्ट, तेल, मीठ, काळीमीरी पावडर, मैदा

कृतीः मैद्यात थोडं तेल टाकून आवरणासाठी पीठ मळून घ्या. (चपातीच्या पीठासारखे पण थोडे घट्ट मळावे). एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात आलं लसून परतून घ्या. परतल्यावर त्यात सेझवॉन सॉस, टोमॅटो सॉस घाला. हे सॉस परतल्यानंतर थोडी शिमला मिरची, कोबी व पनीरचे तुकडे टाका. त्यावर मीठ व काळीमीरी पावडर टाका. सगळं व्यवस्थित परतून घ्या. मैद्याच्या पीठाचे लहान पुरी लाटून घ्या. पुरीत वर तयार केलेलं सारण थंड करुन भरा. त्यानंतर चारही बाजूने फोल्ड करुन त्याचा रोल तयार करुन घ्या. तव्यावर हलके तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजुन घ्या.

टिप्स..आवडत असल्यास या रोलच्या सारणात तुम्ही चीझही घालू शकता.

मुलांसाठी बनवत असताना सेजवान सॉस थोडा कमी टाकून टोमॅटो सॉस जास्त टाकावा.

आपली प्रतिक्रिया द्या