पनीर करी

778

साहित्य : पनीर २०० ग्रॅम, कांदे मध्यम आकाराचे २ बारीक चिरून, हिरव्या मिरच्या २ उभ्या चिरून, चिंचेचा कोळ १ चमचा, नारळाचे दूध  अर्धा कप (आवडीनुसार)

वाटण : खोवलेला नारळ – पाव ते अर्धा कप, लाल सुक्या मिरच्या – ३-४, धणे दीड चमचा, जिरे पाऊण चमचा, आले पाऊण इंचाचा तुकडा, लसूण ६ ते ८ पाकळ्या, दालचिनी १ इंचाचा तुकडा, लवंग ५-६, हळद पाव चमचा, तेल, मीठ.

कृती : सर्वप्रथम धणे व जिरे कोरडे भाजून घ्यावेत. खोवलेला  नारळ किंचित तांबूस रंगावर कोरडा परतून घ्यावा. मिक्सरच्या  भांडय़ात भाजलेले धणे, जिरे, भाजलेला नारळ, सुक्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, दालचिनी, लवंग, हळद हे घालून त्यांत थोडेसे पाणी मिसळून गुळगुळीत वाटून घ्यावे. त्यानंतर तेलावर कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. पाण्याचा किंचित शिडकावा करावा, जेणेकरून कांदा जळणार नाही. त्यात वाटण घालून २-३ मिनिटे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या व मीठ घालून परतावे. पनीरचे तुकडे घालून परतावे. सर्वात शेवटी चिंचेचा कोळ घालावा व नारळाचे दूध घालावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे.  वाढताना वरून आवडीप्रमाणे लिंबू पिळावे. गरमागरम पोळी, फुलका किंवा भाताबरोबर खावे.

आपली प्रतिक्रिया द्या